शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

निमगाव-सिन्नरला श्रीकृष्ण पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:53 IST

सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथील ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत श्रीकृष्ण परिवर्तन व रोकडेश्वर ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. त्यात श्रीकृष्ण परिवर्तनने ११ पैकी ७ जागांवर विजय मिळविताना ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला आहे. विरोधी रोकडेश्वर ग्रामविकासला केवळ ४ जागा मिळाल्या.

ठळक मुद्दे सात जागा जिंकल्या : प्रतिस्पर्धी रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलला केवळ ४ जागा

विकास सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी शेळके, माजी सरपंच बाळासाहेब सानप, जयसिंग नागरे, प्रकाश सानप, प्रकाश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली व बाजार समितीचे संचालक दत्तात्रय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. दुसरीकडे पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन सानप, माजी चेअरमन चांगदेव सानप, अमृता सांगळे, बाजार समितीचे माजी उपसभापती काशिनाथ सानप, माजी सरपंच संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली रोकडेश्वर पॅनल उभा करण्यात आला होता. सरळ लढतीत श्रीकृष्ण पॅनलची सरशी झाली.या पॅनलच्या सात विजयी उमेदवारांमध्ये रंजना नाना सानप (३३५), शिवाजी शेळके (३६१), सुमन नागरे (३०३), संगीता वनवे (२८०), चंद्रकला गुंजाळ (१७५), जयश्री चंद्रमोरे (१६७), सुनंदा आव्हाड (१२७) यांचा समावेश आहे. तर विरोधी पॅनलच्या ४ विजयी उमेदवारांमध्ये दशरथ सानप (२७०), मंगेश सानप (३७६), शांताराम सानप (३८७), वैशाली सानप (४६६) यांचा समावेश आहे, तर श्रीकृष्ण पॅनलच्या नेते, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. मंदिराच्या सभामंडपात विजयी सभा घेण्यात आली. गावाच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न करण्याचा संकल्प सोडण्यात आला.नेत्यांच्या घरातील उमेदवार पराभूतविरोधी रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या घरातील उमेदवारांचा सपाटून पराभव झाला. त्यात सुनीता अमृता सांगळे, मंगल संजय सानप, कुसुम कैलास सांगळे, सुजाता संजय सानप यांचा समावेश आहे. नेत्यांच्या घरातील उमेदवारांचा पराभव झाल्याने पॅनलचा धुव्वा उडाल्याचे बघायला मिळाले. आता विजयी पॅनलच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत