दमलेल्या कार्यकर्त्यांचा ‘रात्री’देखील जोरात ‘प्रचार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:59 IST2019-10-14T23:13:03+5:302019-10-15T00:59:43+5:30
व्रिधानसभेची रणधुमाळी चालू आहे. शहरातील विविध पक्षांतील नेते, पुढारी, कार्यकर्ते आपापल्या परीने ‘पक्षादेश’ मानून ‘अधिकृत’ उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. आता उघड प्रचार करण्याचे अवघे सहा दिवस बाकी असल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. त्यात रविवार सुटीचा एकच दिवस असल्याने सर्वच पक्षातील उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत प्रचार करताना दिसत होते.

दमलेल्या कार्यकर्त्यांचा ‘रात्री’देखील जोरात ‘प्रचार’
व्रिधानसभेची रणधुमाळी चालू आहे. शहरातील विविध पक्षांतील नेते, पुढारी, कार्यकर्ते आपापल्या परीने ‘पक्षादेश’ मानून ‘अधिकृत’ उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. आता उघड प्रचार करण्याचे अवघे सहा दिवस बाकी असल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. त्यात रविवार सुटीचा एकच दिवस असल्याने सर्वच पक्षातील उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत प्रचार करताना दिसत होते. आपली रॅली अधिक लोकांची हवी या अट्टहासामुळे रविवारी प्रत्येक कार्यकर्त्यांना विशेष मागणी होती. त्याकरिता पक्षामधील काही ठेकेदारांनाही विशेष भाव होता. त्यामुळे रस्त्यावर, गल्ली-बोळातून प्रचार करीत जाणारे राजकीय पक्षांचे उमेदवार त्यांचे नेते, पदाधिकारी यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह संचारलेला जाणवत होता. परिणामी काही तेच तेच कार्यकर्ते वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीत दिसत होते. या कार्यकर्त्यांचा ‘जोश’ ‘उत्साह’ अजून किमान आठवडाभर तरी टिकायला हवा म्हणून त्यांना अन्न, वस्र आणि ‘दवा’ पुरविण्याचे ‘काम’ विश्वासू व्यक्तींवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने रविवारी काही भागातील रस्त्याजवळ मोकळ्या जागेत या दमलेल्या कार्यकर्त्यांची खातरजमा करीत त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना ‘दवा’ पुरविल्याने कार्यकर्त्यांचे बरेच ग्रुप ठिकठिकाणी रॅलीच्याच विषयावर ‘गप्पा’ मारताना दिसत होते. ही रात्रीची गर्दी ज्याला माहीत आहे, असे निमुटपणे पाहून पुढे जात होते, तर ज्यांना याबाबत फारशी कल्पना नाही असे लोक सतत (बार-बार) या विषयी विचारणा करीत होते, की अरे बापरे एवढ्या रात्री अजून कार्यकर्ते प्रचार करत आहेत का?