जलसाक्षरता दिनानिमित्त निफाडला जलसाक्षरता दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:54 IST2019-07-15T17:54:21+5:302019-07-15T17:54:46+5:30
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात जल साक्षरता दिनानिमित्त निफाड शहरातून जल साक्षरता दिंडी काढण्यात आली.

जलसाक्षरता दिनानिमित्त निफाडला जलसाक्षरता दिंडी
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात जल साक्षरता दिनानिमित्त निफाड शहरातून जल साक्षरता दिंडी काढण्यात आली.
प्रारंभी एन. एस. वाघ यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. पर्यवेक्षक एस. एम. सोनवणे यांनी पाण्याचे महत्व सांगितले. त्यानंतर या विद्यालयापासून जलसाक्षरता दिंडी निफाड शहरातून काढण्यात आली.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी पाणी आडवा, पाणी जिरवा जल है तो कल है, एक थेंब मोलाचा, पाणी हेच जीवन आदी घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांच्या हातात पाणी बचतीबाबत फलक होते.
या दिंडीत मंडळाचे विश्वस्त मधुकर राऊत, प्राचार्य मालती वाघवकर, उपप्राचार्य. डी. बी. वाघ, पर्यवेक्षक रविकांत कर्वे, एस. एन. चकोर, रमेश सानप, जालिंदर कडाळे, श्रीमती एम. एस. पवार, श्रीमती के. डी. सानप, जी. एस. पवार, भूषण सोनवणे, श्रीमती ए. डी .ढोमसे, श्रीमती पी. ए. कराड, आदींसह विद्यार्थी सामील झाले होते.
त्यानंतर विद्यालयात झालेल्या कार्यक्र मात विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. याप्रसंगी वि . दा. व्यवहारे, प्राचार्य मालती वाघावकर, बी. आर. सोनवणे यांची भाषणे झाली.