निफाडला गोल्फ प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:22 IST2019-12-21T14:22:14+5:302019-12-21T14:22:21+5:30

नाशिक : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अंतर्गत येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गोल्फ असोसिएशन यांच्या ...

 Nifad Golf Training Center | निफाडला गोल्फ प्रशिक्षण केंद्र

निफाडला गोल्फ प्रशिक्षण केंद्र

नाशिक : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अंतर्गत येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गोल्फ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे गोल्फ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले.
निफाड-पिंपळगाव रस्त्यावर २२ एकर प्रशस्त जागेत रिव्हरसाइड गोल्फ कोर्स येथे गोल्फचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याप्रसंगी कर्नल अंजन के. सूर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, गोल्फ असोसिएशनचे अध्यक्ष विंग कमांडर प्रदीप बागमार, सचिव नितीन हिंगमिरे, शीतल बागमार, अशोक दुधारे, क्रीडा अधिकारी दिलीप खिल्लारे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित खेळाडूंनी गोल्फ खेळाची तंत्रशुद्ध प्रात्यक्षिके दाखविली. येथील रिव्हरसाइड गोल्फ कोर्स येथे गोल्फचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व ज्येष्ठांनी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  Nifad Golf Training Center

टॅग्स :Nashikनाशिक