बंधाऱ्याच्या खोलीकरणाला युवामित्रांचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:46 IST2018-12-14T17:45:02+5:302018-12-14T17:46:13+5:30
सिन्नर तालुक्यातील नि-हाळे-फुत्तेपूर परिसरात ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत बंधा-यातील गाळ उपसा व नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे शिवारात पाणीसाठ्यात वाढ होवून शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. नि-हाळे येथील सरपंच अण्णा काकड यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

बंधाऱ्याच्या खोलीकरणाला युवामित्रांचा हातभार
तालुक्यातील लोणारवाडी येथील युवामित्रच्या सहकार्याने सुरू असलेल्या नाला खोलीकरण व गाळ मुक्त धरण कामामुळे नि-हाळे-फ त्तेपूर परिसरात शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. एक ते दीड किलोमीटर झालेल्या नाला खोलीकरण व गाळमुक्त बंधाºयामुळे एकाच नाल्यात पाण्याची वाढ होणार आहे. वाढणाºया पाणीसाठ्यातून शेकडो एकर क्षेत्र आगामी काळात ओलीताखाली येणार आहे. दुष्काळामुळे जमीनीतील पाण्याची पातळी खालवली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत आहे. पाण्याचे महत्व लक्षात घेवून शेतकरी गाळ मुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकाश दराडे, सविता सांगळे, कविता यादव, शोभा माळी, ग्रामविकास अधिकारी ए. बी. आहिरे, दत्तात्रय माळी, वैभव दराडे, दत्तू काळसकर आदींनी परिश्रम घेत आहेत.