नाशिकमध्ये कचरा कुंडीत टाकले नवजात अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 20:50 IST2019-05-15T20:49:24+5:302019-05-15T20:50:38+5:30
शिक्षिका मंदा शिंदे या रस्त्याने जात असताना त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हालचाल सुरु असल्याचे दिसले.

नाशिकमध्ये कचरा कुंडीत टाकले नवजात अर्भक
नाशिक : शहरातील नासर्डी ब्रिज वडाळा रस्त्याच्या बाजुच्या कचरा कुंडीत स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.
शिक्षिका मंदा शिंदे या रस्त्याने जात असताना त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हालचाल सुरु असल्याचे दिसले. ही पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये नवजात अर्भक दिसले. या शिक्षिकेने या बाळाला सामाजिक लहान मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेमध्ये नेत पोलिसांना खबर दिली. यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी हे अर्भक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते.