शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:42 IST

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली.

ठळक मुद्देवन्यजीव विभाग अन‌् २६ गावांच्या बैठकीत झाला निर्णयपर्यटकांची होणार ॲन्टिजेन चाचणीमहिनाभरापुर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंधडेल्टा प्लसची भीती

नाशिक : "डेल्टा प्लस' या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकवन्यजीव विभागाने कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य व आजुबाजुची पर्यटनस्थळे 'वीकेण्ड'ला बंद ठेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांलगतच्या पर्यटनावर निर्बंध आल्याने अभयारण्य भागात पर्यटकांची झुंबड उडत होती. यामुळे अभयारण्यातील गावांच्या सुरक्षिततेसाठी शनिवार, रविवारी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान, डेल्टा प्लस चा शिरकाव गावपातळीवर होऊ नये, यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून शनिवार, रविवारी पर्यटकांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामोर्तब केल्याचे रणदिवे यांनी सांगितले. याप्रसंगी भंडारदरा वनक्षेत्रपाल अमोल आडे, राजूरचे वनक्षेत्रपाल दत्तात्रट पडवळे, वनपाल रवींद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची चिन्हे दिसत असताना नाशिक वनवृत्तामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, नांदुरमध्यमेश्वर, जळगावचे यावल आणि धुळे येथील अनेर डॅम अभयारण्यांच्या वाटा ८जून रोजी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

महिनाभरापुर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंधजेमतेम महिना होत नाही तोच या कोरोनाच्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. या विषाणुने वातावरणात टिकाव धरण्यासाठी पुढची पायरी गाठली असून डेल्टा प्लस असे त्याला नाव देण्यात आले आहे. महिनाभरात कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील पर्यटनावर निर्बंध घालण्याची वेळ ओढावली आहे.या पर्यटनस्थळांवर मज्जावअभयारण्य परिसरातील रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदीर, साम्रदची सांदण व्हॅली, रतनगड, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, नेकलेस वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल, कुमशेतचा परिसर, इकोसिटी घाटघर, पांजरे वॉटरफॉल आदी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना वीकेण्डला जाता येणार नाही.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनRainपाऊस