शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

राज्यात वीजनिर्मितीचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 1:43 AM

उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व  शेतीच्या  हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रविवारी (दि.७) मार्चला सकाळी सव्वाआठ वाजता आतापर्यंतची सर्वात उच्चांकी ८ हजार १०४  मेगावाट वीज निर्मिती झाली.

ठळक मुद्दे८ हजार ४०१ मेगावॉट : मागणी वाढल्याने महानिर्मितीची धडपड कामी

शरदचंद्र खैरनार / लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व  शेतीच्या  हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रविवारी (दि.७) मार्चला सकाळी सव्वाआठ वाजता आतापर्यंतची सर्वात उच्चांकी ८ हजार १०४  मेगावाट वीज निर्मिती झाली. याआधी २० मे २०१९ रोजी ७ हजार ६११  मेगावाट वीज निर्मिती झाली होती. त्या तुलनेत ४९३ मेगा वॅट जादा वीजनिर्मिती करुन मागील रेकॉर्ड ब्रेक केले आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली. यानिमित्ताने महानिर्मितीच्या सर्वच औष्णिक विद्युत केंद्रांची उल्लेखनिय होत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काही संचांचा भारांक ९० टक्केपेक्षा अधिक आहे. त्यात भुसावळ युनिट चार ९४ टक्के, युनिट पाच ९८.९६ टक्के, चंद्रपूर युनिट आठ ९९.९४ टक्के, युनिट नऊ ९५.५५ टक्के, खापरखेडा युनिट तीन ९१.१६ टक्के, युनिट पाच ८९.९५ टक्के, पारस युनिट तीन ९५.४२ .टक्के, परळी युनिट सहा ९१.१६  टक्के, युनिट आठ ९४.४८ .टक्के यांचा समावेश आहे.काही ठिकाणचे संच जुने व वकालबाह्य होत असले तरीही वीज उत्पादनात कमी नाहीत.अशीच कामगिरी असली तर महानिर्मितीचा सुवर्णकाळ पुन्हा येईल अशी खात्री तज्ञांनी दिली आहे.रविवारी झालेले विक्रमी उत्पादन असेnनाशिक- युनिट चार १७६, युनिट पाच १८५ अशी एकूण ३६१ मेगावॉट. nकोराडी- युनिट सहा १८०, युनिट सात १४१, युनिट आठ ५४२, युनिट नऊ ५२१, युनिट दहा ५४२ अशी एकुण १९२५ मेगावॉट.  nखापरखेडा- युनिट एक १४३, युनिट दोन १५०, युनिट तीन १६६, युनिट चार १७५, युनिट पाच ४६३ अशी एकुण १०९८ मेगावॉट.  nपारस- युनिट तीन १२४, चार २२० अशी ३४३ मेगावॉट.  nपरळी- युनिट सहा २३०, युनिट सात २३०, युनिट आठ २३० अशी एकुण ६८९ मेगावॉट.  nचंद्रपूर- युनिट तीन १३६, चार १३८, पाच ४०१, युनिट सहा ४०३, युनिट आठ ४८१, युनिट नऊ ४३६ अशी १९९५ मेगावॉट.  nभुसावळ- युनिट तीन १७१, युनिट चार ४५१, युनिट पाच ४७२ अशी एकुण १०९४ मेगावॉट.  म्हणजेच थर्मल ग्रॉस ८१०४ अशी उच्चांकी वीज निर्मिती झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज