नवीन ३२५ कोरोनाबाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:56 IST2020-11-25T00:56:11+5:302020-11-25T00:56:35+5:30
जिल्ह्यात सोमवारी (दि. २३) नवीन २२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर जिल्ह्यात केवळ एकमेव रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींची संख्या १७६६ वर पोहोचली आहे.

नवीन ३२५ कोरोनाबाधित !
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २३) नवीन २२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर जिल्ह्यात केवळ एकमेव रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींची संख्या १७६६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९८ हजार ९५४ वर पोहोचली असून, त्यातील ९४ हजार ४७६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २७१२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.४७ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.१८, नाशिक ग्रामीण ९४.२१, मालेगाव शहरात ९३.८०, तर जिल्हाबाह्य ९१.९६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २७१२ बाधित रुग्णांमध्ये १६०० रुग्ण नाशिक शहरात, ९४४ रुग्ण नाशिक ग्रामीणला, ९४ रुग्ण मालेगावमध्ये, तर २४ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ७० हजार ३११ असून, त्यातील दोन लाख ६९ हजार ५४५ रुग्ण निगेटिव्ह, तर ९८ हजार९५४ रुग्ण बाधित आढळून आले असून, १८१२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.