नामदेव क्षत्रिय महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेवासकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 16:55 IST2019-08-21T16:48:00+5:302019-08-21T16:55:01+5:30
कार्यकारिणी जाहीर : राष्टय अध्यक्षपदी डॉ. पाथरकर

नामदेव क्षत्रिय महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेवासकर
नाशिक : नवी दिल्ली येथील अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच होऊन महासंघाच्या राष्टय अध्यक्षपदी डॉ.एन.जी. पाथरकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नाशिकचे अरु ण नेवासकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अमरावती चांदूर बाजार येथील जी.एस. टोम्पे महाविद्यालयातील संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात भास्करराव टोम्पे व अठरा राज्यातील आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत शिरोमणी नामदेव महाराजांचे अनुयायांसह विविध शिंपी समाज पोटजातीतील विखुरलेले ज्ञातीबांधव संघटित झाले तर ताकद तयार होईल. त्यातूनच राजकारणात सामाजिक गरज निर्माण होऊन शिंपी समाजास विशेष स्थान प्राप्त होऊ शकते, असे मंथन यावेळी झाले. बैठकीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त २०२० वर्ष हे साजरे करण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले. त्यानिमित्त संपूर्ण भारतभर मशाल यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर मशाल यात्रा पंढरपूर येथून निघणार असून भारतातील विविध ठिकाणी सामाजिक एकता,बंधुता व संत नामदेवांच्या विचारांची जनजागृती करण्यात येणार आहे.
लवकरच राज्य कार्यकारिणी
नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी भास्करराव टोम्पे, महासचिवपदी ईश्वर धिरडे, मुख्य समन्वयक अनंत जगजोड, प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे आदिची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण खोडे यांनी केले. दरम्यान, पुढील कार्यकारिणीची बैठक लवकरच होऊन त्यात राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अरु ण नेवासकर यांनी सांगितले.