शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप

By अझहर शेख | Updated: October 23, 2022 18:56 IST

नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला आहे. 

नाशिक : 'पुढच्या वर्षी लवकर ये, अन् वेळेवर परत जा...' अशा शब्दांत नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला. रविवारी (दि.२३) देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतल्याचे हवमान खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवर जाहीर केले. मान्सून देशाच्या उर्वरित सर्व भागातून परतला आहे. यामुळे बळीराजाला हा मोठा दिलासा आहे. यावर्षी नाशिकमध्ये देखील विक्रमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यांत पावसाने यापुर्वीचे सर्वच आकड्यांना मागे टाकले. या हंगामात सुमारे १,२१९.५ मिमी इतका पाऊस नाशिक शहरात सप्टेंबरअखेरपर्यंत झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे.

 कधी नव्हे तो इतका यावर्षी सप्टेंबर महिन्यात ३१७.२ मिमी इतका उच्चांकी पाऊस पडला. जून महिन्यात शंभरीदेखील न गाठलेल्या पावसाने जुलैमध्ये थेट पाच शतक ठोकले. ११ ते १२ जुलै दरम्यान २४ तासांत शहरात सर्वाधिक ९७.४ मिमी इतका पाऊस पडला होता. हा पाऊस हंगामाातील उच्चांकी ठरला. नाशिकमध्ये २०१९सालानंतर यावर्षी सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १७५.८ मिमी इतका पाऊस पडला आहे.

'सीतरंग'ने चुकविला होता ठोकापरतीच्या पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य स्थती ओढावली होती. दिपावलीच्या तोंडावर बंगालच्या उपसागरामध्ये ‘सीतरंग’नावाचे चक्रीवादळ घोंगावू लागल्याने पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकला; मात्र त्यातच मान्सूनने देशाच्या उर्वरित भागातूनसुद्धा माघार घेतल्याची वार्ता हवामान खात्याकडून आल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला.

परतीच्या प्रवासात जोरदार 'तडाखा' मान्सूनने परतीच्या प्रवासात जोरदार तडाखा दिला. सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतपीकांची मोठी नासाडी झाली. यामुळे बळीराजाचा मोठा हिरमोड झाला; मात्र मान्सून देशातील उर्वरित भागातूनदेखील बाहेर पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना निसर्गाकडून एकप्रकारे ‘गिफ्ट’ मिळाले. २४ तासांत कोकणातील दोन शहरे वगळता राज्यात कोठेही पावसाची नोंद रविवारी झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसSocial Mediaसोशल मीडिया