पंधरा वर्षांपासून नगरसेवकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:31 IST2020-09-15T00:15:42+5:302020-09-15T01:31:50+5:30
सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पंधरा वर्षांपासून नगरसेवकांचे दुर्लक्ष
सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सावरकरनगर येथील राजश्री पार्क ही वसाहत 15 वर्षांपासून तयार झाली आहे.अंतर्गत रस्त्यांची साधी डागडुजी देखील केली नसल्याने दुरावस्था झाली आहे. निळकंठेश्वर मंदिर ते राजश्री पार्क रस्ता पंधरा वर्षात एकदाही डांबरीकरण झालेला नाही.या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.हा रस्ता त्वरित डांबरीकरण होणे गरजेचे आहे.तसेच उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे आरोग्याच प्रश्न निर्माण झाला आहे.या ठिकाणी उद्यान विकसित करण्यात यावे,पथदीप नादुरुस्त अवस्थेत आहेत.पाच ते दहा वर्षांपूर्वी उदयास आलेल्या वसाहतींना सर्व सुविधा पुरविल्या जातात.तेथील समस्यांकडे लक्ष दिले जाते.मात्र आम्ही गेल्या 15 वर्षांपासून येथे राहतो आमच्याकडे कोणीही फिरकून पहात नाहीत.नगरसेवक नेमकी कोणती कामे करतात.असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,रवींद्र पाटील,वाकलकर, वीर,जालिंदर विधाते,उत्तम विधाते,बापू सोनवणे,काश्मीरे, पगारे,सिंग आदींसह संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी दखल घेऊन राजश्री पार्क मधील समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादीच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे (फोटो ल्ल२‘ वर राजश्री)