कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:50 PM2020-04-05T22:50:33+5:302020-04-05T22:51:20+5:30

लासलगाव : पिंपळगावनजीक येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आतापर्यंत पाठवलेले सर्व नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे व निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी दिली.

Negative reports of koronadbhita contact | कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देदररोज औषध प्रतिबंधक फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : पिंपळगावनजीक येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आतापर्यंत पाठवलेले सर्व नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे व निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी दिली.
दरम्यान, सध्या येथील बरेच नागरिक बेशिस्त वागत असून, मास्क न लावता, सॅनिटायझर्सची व सोशल डिस्टन्सचा वापर न करता मुक्त संचार करीत असल्याचे दिसून आले. अजून दहा दिवस तरी नागरिकांना अधिक काळजी घेत घरी थांबून प्रशासनास सहकार्य करावे लागणार असल्याने गावातील या दृश्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तसेच बाधिताच्या चार नातेवाइकांचे रिपोर्ट येणे बाकी होते, तेदेखील आता निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाला हायसे वाटले आहे. पिंपळगावनजीक येथील ग्रामविकास अधिकारी कदम हे घटनेनंतर येथेच तळ ठोकून असून, त्यांनी दररोज औषध प्रतिबंधक फवारणी आदी मोहिमा राबवून प्रशासनास अहवाल दिलेला आहे, असे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सांगितले.

Web Title: Negative reports of koronadbhita contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.