Neemgava animals bring neem cake | नांदगावला जनावरांना कडुनिंबाचा पाला
नांदगावला जनावरांना कडुनिंबाचा पाला

ठळक मुद्देजनावरांच्या वैरणीचा व पाण्याचा प्रश्न गंभीर

नांदगाव : नांदगाव तालुक्यात वैरणीवाचून जनावरांचे हाल सुरू असून, अद्याप एकही चाराछावणी किंवा चारा डेपो सुरू न झाल्याने पशुपालकांवर जनावरांना कडुनिंबाचा पाला खाऊ घालण्याची वेळ आली आहे.
जनावरांच्या वैरणीचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, राज्यात इतरत्र चारा छावण्या व डेपो सुरू झाले आहेत; पण नांदगाव तालुक्यात अद्याप एकही चारा छावणी किंवा डेपो सुरू नाही त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने कडुनिंबाचा पाला वैरण म्हणून खाऊ घालत आहेत. चारा छावण्या किंवा डेपो सुरू करण्याची मागणी चांदोरा, ढेकू ,नांदगाव, बाणगाव, साकोरा आदींसह अनेक गावांनी केली असताना मे महिना संपत आला तरीदेखील शासनाचा प्रतिसाद नाही. दरम्यान, चाऱ्यासाठी येथील सामाजिक संस्था छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळाने पुढाकार घेतला आहे.

Web Title: Neemgava animals bring neem cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.