बालसाहित्यात आधुनिकतेचा सूर आवश्यक : किरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:43 IST2018-12-30T00:43:38+5:302018-12-30T00:43:56+5:30
नाशिक : बालसाहित्यातून अजूनही झुक झुक आगीन गाडीचे चित्र जात नाही. यात काळाप्रमाणे बदल होणे अपेक्षित असून, बालमनाच्या वेगासोबतच ...

बालसाहित्यात आधुनिकतेचा सूर आवश्यक : किरण केंद्रे
नाशिक : बालसाहित्यातून अजूनही झुक झुक आगीन गाडीचे चित्र जात नाही. यात काळाप्रमाणे बदल होणे अपेक्षित असून, बालमनाच्या वेगासोबतच बालसाहित्यिकांनीही त्यांच्या कल्पक तेत बदल करून आपल्या साहित्यातून आधुनिकतेचा नावीन्यपूर्ण सूर उमटविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.
कालिकादेवी मंदिराच्या सभागृहात शनिवारी (दि.२९) साहित्यिक तथा कवी संजय वाघ लिखित ‘गाव मामाचं हरवलं’ या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा साहित्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, कालिकादेवी संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते. यावेळी केंद्रे म्हणाले, अवांतर वाचनाशिवाय शिक्षण प्रक्रिया अपुरी आहे. पुस्तक मुलांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. उद्याची पिढी घडवायची असेल तर आजच मुलांमध्ये बालसाहित्याची गोडी निर्माण करावी लागेल, त्यासाठी बालसाहित्यिकांनी त्याच जुन्या कथा, कवितांच्या कल्पनांतून बाहेर पडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. लेखक संजय वाघ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्रावणी गिते हिने काव्यसंग्रहातील ‘माय करुणासागर, माय वात्सल्य घागर’ कवितेचे सादरीकरण के ले. प्रास्ताविक प्रा. शंकर बोºहाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल पाटील यांनी केले. प्रकाशक सुनील वाघ यांनी आभार मानले.
बालसाहित्यात अधिक वास्तविकतेची गरज
सामाजिक, कौटुंबिक विखुरलेपण आणि नागरीकरणाच्या वाढत्या कोलाहलात खरोखरच मामाचे गाव हरवून गेले आहे. मामाचे गाव ही संस्काराची शिदोरी देणारी संस्कृती असते. पण उद्याचे भविष्य घडविणाऱ्या अलिकडच्या बाल साहित्यात पुरेशा ताकदीने हे संस्कार व वास्तविकता येत नाही. संजय वाघ यांच्या कवितांमधून यादृष्टीने सूर मिळण्याची अपेक्षा किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्याच्या साहित्यिकांचे बालवाङमयाकडे दुर्लक्ष होत आहे. लहान मुलांना मनोरंजक पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधू शकेल, असे बालसाहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुलांचे डोळे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाइलवर स्थिरावले आहे. यातून त्यांना बाहेर काढायचे असेल तर मुलांच्या मनाला पडणाºया विविध प्रश्नांची उत्तरे बालसाहित्यातून त्यांना मिळणे आवश्यक आहे.
- डॉ. रणधीर शिंदे, समीक्षक