शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

‘शाळा बंद’च्या विरोधात लढ्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:07 AM

कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे मत सीटूच्या राष्टÑीय अध्यक्ष के. हेमलता यांनी व्यक्त केले.

सिडको : कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे मत सीटूच्या राष्टÑीय अध्यक्ष के. हेमलता यांनी व्यक्त केले.खुटवडनगर येथील सीटू भवनात आयोजित शिक्षणाचे व्यापारीकरण व बरोजगारीविरोधी महाराष्टÑ राज्य कामगार, विद्यार्थी व युवक परिषदेप्रसंगी के. हेमलता बोलत होत्या. व्यासपीठावर सीटूचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम, डीवायएफआयच्या राज्य सरचिणीस प्रिती शेखर, डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष सुनील धनवा, एसएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सरचिटणीस बालाजी कडेलवाड, सीटूचे राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे आदी उपस्थित होते. हेमलता पुढे म्हणाल्या सरकारने महाकाय रेल्वे व्यवस्था मोडून देशी अणि विदेशी खासगी व्यावसायिकांच्या हाती देण्याचे ठरविले आहे. भाजपा सरकारने मागील गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थीविरोधी निर्णय घेण्यात आलेले आहेत.शिक्षण हक्क कायदा सोडला तर इतर सर्व शैक्षणिक धोरणं ही विद्यार्थीविरोधी व बाजारू व्यवस्थेला मोकळे रान करणारीच आहे. तसेच कामगार व मजुरांच्या विरोधात व मालकांच्या बाजूनेच कायदे करण्यात येत असल्याने यापुढील काळात देशाला बेरोजगारी व शिक्षणाचे खासगीकरण करणाºया सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचेही हेमलता म्हणाल्या.  माजी आमदार नरसय्या आडम यांनी देखील सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. गेल्या दि. ३ जानेवारी महाराष्टÑ बंद यशस्वी झाल्याने सरकार हतबल झाले होते. या देशात बेरोजगारी वाढतच असून, शेतकरी आत्महत्या करीत आहे.  भारतात २२ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असून, यापैकी उच्च शिक्षण घेणाºयांची संख्या अवघी ७० लाख इतकीच आहे. गरीब, आदिवासी व शेतकºयांच्या मुलांनी व ज्याला कसलाही आधार नाही त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, असे आडम यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक