शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज : महेश झगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:12 IST2018-02-21T20:10:07+5:302018-02-21T20:12:38+5:30
जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज : महेश झगडे
नाशिक : जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे बुधवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नरहरी ङिारवाळ, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. झगडे म्हणाले, प्रक्रीया केलेले अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. ही चांगली संधी समजून शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन घ्यावे आणि एकित्रत येऊन त्यावर प्रक्रीया करावी. त्यासाठी कृषि विभागाला प्रयत्नपूर्वक शेतकऱ्यांची मानिसकता तयार करावी लागेल अशी अपेक्षा झगडे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह्यकिडनाशके-ओळख व हाताळणीह्ण या पुस्तकाचे आणि शेतकऱ्यांच्या यशकथेवर आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रत उलेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शेंद्रीय शेतीचे 236 स्टॉल
कृषी महोत्सवात एकूण 236 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यात जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सेंद्रीय भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या प्रदर्शनातून उपलब्ध करून दिली आहेत. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीर्पयत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.