शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

समाजात वाचन संस्‍कृती रुजविण्याची गरज, कुलगुरू इ. वायुनंदन यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 6:48 PM

ग्रंथ किंवा पुस्‍तके माणूस घडविण्‍याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्‍कृत, प्रगल्‍भ होतात. देश भौतिकदृष्‍टया कितीही विकसित असला तरी तो सांस्‍कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्‍यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाचन संस्‍कृती आता घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देग्रंथ चळवळ करते माणूस घडविण्‍याचे काम वाचन संस्‍कृती घराघरात रुजविण्याची गरज कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‘क्षमता विकास’ राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन

नाशिक : ग्रंथ किंवा पुस्‍तके माणूस घडविण्‍याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्‍कृत, प्रगल्‍भ होतात. देश भौतिकदृष्‍टया कितीही विकसित असला तरी तो सांस्‍कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्‍यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाचन संस्‍कृती आता घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे राजा राममोहन रॉय पुस्तकालय प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने क्षमता विकास विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांच्या हस्ते सोमवारी उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, कार्यशाळेचे समन्वयक अनिर्बन बिश्वास, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि ग्रंथालय प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. वायुनंदन म्हणाले, नव्‍या पिढीची मानसिकता ओळखून त्‍यांच्‍या सोयीने पुस्‍तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्‍यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे केल्यास वाचन संस्‍कृतीचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल. शिवाय वाचन चळवळीला गतीमानता प्राप्‍त होईल. समाजाच्या विकासासाठी ग्रंथ हेच गुरु असून वाचनातून जीवन समृद्ध करायला हवे असे सांगून शिक्षणाबरोबरच खेळ, कला, संस्कृती आणि परंपराही जोपासायला हवी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्वेता जाधव यांनी केले.

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिकStudentविद्यार्थी