शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

भारतीय भाषांचे अभ्यासक निर्माण होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:39 IST

चांदवड - भारतीय भाषांचे अभ्यासक निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत येथे संपन्न झालेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच् ोसदस्य राजेश पांडे यांंच्या हस्ते येथील आबड लोढा जैन महाविद्यालयात मराठी विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तौलिनक साहित्य आणि भाषांतर : संशोधनाच्या नव्या दिशा’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

ठळक मुद्दे मान्यवरांचे मत:तौलिनक साहित्य , भाषांतर यावर चांदवडला चर्चासत्र

चांदवड - भारतीय भाषांचे अभ्यासक निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत येथे संपन्न झालेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच् ोसदस्य राजेश पांडे यांंच्या हस्ते येथील आबड लोढा जैन महाविद्यालयात मराठी विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तौलिनक साहित्य आणि भाषांतर : संशोधनाच्या नव्या दिशा’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले. दिल्ली येथील विश्वविद्यालयाचे माजी मराठी विभागप्रमुख निशिकांत मिरजकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त चर्चासत्र आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जवाहरलालजी आबड होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे विजय सोनवणे ,सौ.पांडे राजेश आढाव,डॉ.राजेंद्र मलोसे उपस्थित होते.राजेश पांडे म्हणाले की, इंग्रजी,हिंदी,मराठी या भाषांमध्ये भारतीय भाषांमधले व जागतिक भाषांमधले साहित्य भाषांतरीत झाले तर ते आपल्याला अवगत करता येते. राज्य मराठी संस्थेचे संचालक डॉ.आनंद काटीकर यांनी भारतीय भाषांचे अभ्यासक निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बीजभाषणात ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके म्हणाले की, तौलिनक साहित्याच्या अभ्यासकाला साहित्याच्या ज्ञानाबरोबरच तत्त्वज्ञान, इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र,मानवशास्त्र या ज्ञानशाखांकडूही साहित्याच्या अभ्यासासाठी साहाय्य घेता येते. असे सांगितले. राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांनी भाषेच्या अभ्यासाचे महत्व सांगितले.ज्येष्ठ समीक्षक निशिकांत मिरजकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.चांदवड शिंपी समाज बांधवांच्या वतीने मुकेश कोकणे यांनी मिरजकरांना बांधला. डॉ.मिरजकर म्हणाले तौलिनक साहित्य या विषयात चांगल्या प्रकारे चांगले लेखन करता आले .पहिले सत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ.सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.शिरीष लांडगे-पाटील यांनी ‘मध्ययुगीन मराठी साहित्य आण ितौलिनक अभ्यास’ या विषयावर शोधनिबंध वाचन केले.पुणे येथील डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांनी ‘तौलिनक साहित्याभ्यास आणि विद्यापीठे’ या विषयावर शोधनिबंध सादर केला.यावेळी प्रा.विजय केसकर यांनी हिन्दी व मराठी दलित साहित्य: एक तौलिनक अभ्यास’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला.दुसऱ्या दिवशी दुसरे सत्र अनुवाद (भाषांतर )या विषयावर रंगले.यात अमरावती येथील शासकीय महाविद्यालयाचे पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. केशव तुपे यांनी ‘मराठीतील अनुवाद विचार’ तर कवी गणेश विसपुते यांनी ‘नाटकाची भाषांतरे:एक तौलिनक विचार’ तसेच खर्डी (जि.ठाणे)येथील प्राचार्य डॉ.कैलास कळकटे यांनी ‘कथात्मक साहित्याचे भाषांतर’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला.या दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन गणेश आहेर व योगेश आहिरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ.तुषार चांदवडकर यांनी तर महविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल डॉ.जी.एच.जैन यांनी सादर केला. उपप्राचार्य डॉ.दत्ता शिंपी यांनी आभार मानले. --------चांदवड आबड,लोढा सुराणा व जैन महाविद्यालयात चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना . राजेश पांडे तसेच व्यासपीठावर जवाहरलाल आबड,वसंत आबाजी डहाके,डॉ निशिकांत मिरजकर, सौ.ललिता मिरजकर,डॉ.दिलीप धोंडगे,डॉ.जी.एच.जैन,आनंद काटीकर,सतीश बडवे,शिरीष लांडगे