शेतीच्या मालकी हक्कासाठी लढा उभारण्याची गरज : महेश झगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:45 IST2018-10-09T00:44:16+5:302018-10-09T00:45:01+5:30
शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.

शेतीच्या मालकी हक्कासाठी लढा उभारण्याची गरज : महेश झगडे
नाशिक : शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतक-यांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.
शेतकरी संघटनेच्या वतीने ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या व्यक्तिचरित्राच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि.८) विशाखा सभागृहात करण्यात आले. यावेळी झगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. दौलतराव घुमरे होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, शेतकरी संघटनेचे रामचंद्रबापू पाटील, आत्मचरित्राचे लेखक भानू काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी झगडे म्हणाले, देशात व राज्यात उपयोगिता संपलेले काही कायदे असून, उदासीन प्रशासकीय व्यवस्थेमुळे शेतकºयांना न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागतात. स्वातंत्र्यानंतरही शेतकरी रस्त्यावर उतरून न्यायहक्कासाठी संघर्ष करताना दिसतो, हे दुर्दैवी आहे. अधिकाºयांना संरक्षण दिले जाते आणि शेतकरी वाºयावर सोडला जातो, अशी परखड टीका झगडे यांनी यावेळी केली. भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या लोकआंदोलनाचा धांडोळा घेत त्यांचे त्याग, समर्पण व लढ्याची नोंद व्हावी, या उद्देशाने लिखाणाची जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. परिचय मिलिंद जहागिरदार व अॅड. नानासाहेब जाधव यांनी करून दिला.
व्यवस्था बदलाची गरज
शेती, शेतकरी आणि चळवळ वाचविण्यासाठी व्यवस्था बदलाची गरज आहे, असे मत लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. जोशी यांनी व्यवस्था व ती राबविणाºया लोकांच्या वृत्तीचा अभ्यास करून चळवळ उभी केली. मात्र अलीकडे चळवळीच्या नावाखाली व्यवस्थेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसून येतो, यामुळे चळवळी दुबळ्या होतात. शेती व शेतकºयांची अवस्था बदलायची असेल तर व्यवस्थाच बदलावी लागेल असे ते म्हणाले.