शेतीसोबत जोडधंदे स्वीकारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:13 IST2018-04-29T01:13:49+5:302018-04-29T01:13:49+5:30
जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. २८) उमटला.

शेतीसोबत जोडधंदे स्वीकारण्याची गरज
नाशिक : जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. २८) उमटला.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि स्वामी समर्थ कृषी विकास आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ‘कृषीमाल प्रक्रिया उद्योग व जोड व्यवसायातील संधी’ या चर्चासत्रात मुळशी येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके व टेक्नॉलॉजी सायन्स फॉर सोसायटी संस्थेच्या डॉ. शीतल सोमाणी यांनी सहभागी होत शेतकरी व कृषी शाखेच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ज्या शेतकºयांनी शेतीसोबत जोडधंद्याचा मार्ग स्वीकारला त्यांनी आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे अन्य शेतकºयांनीही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि आपली भौगोलिक परिस्थिती विकसित होऊ शकणारा व्यवसाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर शेती आणि शेतकरी टिकून राहण्यासाठी व शेती क्षेत्राचा उत्कर्ष साधण्यासाठी कृषीमाल प्रक्रिया उद्योग आणि जोडधंदे या दोन्हींची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत डॉ. शीतल सोमाणी यांनी व्यक्त केले. दरम्यान, शुक्रवारपासून कृषी महोत्सवांतर्गत वसविण्यात आलेल्या बाराबलुतेदार गावास व कृषी प्रदर्शनास शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. शनिवारी वीके ण्डमुळे भेट देणाºयांच्या संख्येत आणखी भर पडल्याचे दिसून आले.