Near Corona-bound Pachsen! | कोरोनाबाधित पाचशेनजीक !

कोरोनाबाधित पाचशेनजीक !

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी (दि. २८) पाचशेनजीक गेली आहे. रुग्णसंख्येने ४८१ चा आकडा गाठला, तर १८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरात एक, ग्रामीणला २ तर जिल्हाबाह्य एक मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या २१०५ वर पोहोचली आहे. 
जिल्ह्यात बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २२ हजार ८१० वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १७ हजार ५५५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ३१५० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.७२ वर घसरली आहे. त्यात शहरात ९५.९५, ग्रामीण ९५.७३, मालेगाव ९२.६२, तर जिल्हाबाह्य ९३.०२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ४२ हजार ४५२ असून, त्यातील चार लाख १८ हजार ९१२ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २२ हजार ८१० रुग्ण बाधित आढळून आले आहे.

Web Title: Near Corona-bound Pachsen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.