शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत कॉँग्रेसला रसद पुरविणार राष्टÑवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:58 IST

इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा परिषदेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला गळ टाकून पक्ष प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नाशिक : इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा परिषदेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला गळ टाकून पक्ष प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे राष्टÑवादीच्या या प्रयत्नांना गावित यांच्या विरोधकांनीही बळ देण्याचे ठरविले आहे.निर्मला गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. वरकरणी मतदार- संघातील विकासकामे करण्यासाठी आपण सेनेत प्रवेश करीत असल्याचे गावित यांनी म्हटले असले तरी, मतदारसंघात त्यांच्या विरोधातील वातावरण पाहता, त्यांनी पक्ष बदलून सेनेकडून उमेदवारी करण्यासाठीच पक्षांतर केल्याचे बोलले जात आहे; मात्र गावित यांच्या सेना प्रवेशाला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शविला त्याचबरोबर सेनेच्या इच्छुक उमेदवारांकडूनदेखील मातोश्रीवर धाव घेऊन गावित यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली. इगतपुरी मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी गावित यांच्या विरोधात एकत्र येत निवडणुकीत त्यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वातावरण गरम झाले असताना कॉँग्रेसकडे मात्र गावित यांना टक्कर देण्यायोग्य सक्षम उमेदवाराची वानवा असल्याची बाब आघाडीच्या नेत्यांच्या निदर्शनास आली आहे.जागा वाटपात इगतपुरीची जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असून, यंदाही ती कॉँग्रेसला सोडण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू असताना नाशिकच्या दौºयावर आलेले राष्टÑवादीचे शरद पवार यांनी इगतपुरी मतदार संघाची राजकीय परिस्थिती जाणून घेताना कॉँग्रेसला गावीत यांच्या विरोधात रसद पुरविण्याचे संकेत दिले.जागा वाटपात इगतपुरीची जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असून, यंदाही ती कॉँग्रेसला सोडण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू असताना नाशिकच्या दौºयावर आलेले राष्टÑवादीचे शरद पवार यांनी इगतपुरी मतदार संघाची राजकीय परिस्थिती जाणून घेताना कॉँग्रेसला गावीत यांच्या विरोधात रसद पुरविण्याचे संकेत दिले. त्यानुसार राष्टÑवादीकडून यंदा देवळाली मतदार संघातून निवडणुकीची तयारी करणाºया जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाºयालाच कॉँग्रेसमध्येच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदाधिकाºयाला विधानसभा निवडणुकीचा पुर्वानुभव असून, कॉँग्रेसने देखील त्याला पक्षात घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीच्या या पदाधिकाºयाला इगतपुरी विधानसभा मतदार संघातील गावीत यांच्या सर्वपक्षीय विरोधकांनी देखील सहमती दर्शविली असून, त्यामुळे इगतपुरीच्या तप्त राजकीय वातावरणात भर पडली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019igatpuri-acइगतपुरीNirmala Gavitनिर्मला गावितcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस