चांदवडला राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:17 IST2021-07-06T17:16:49+5:302021-07-06T17:17:32+5:30

चांदवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य नासिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह चांदवड येथे संपन्न झाली.

NCP meeting at Chandwad | चांदवडला राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक

चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत बोलतांना रविंद्र पगार, समवेत उत्तम भालेराव, डॉ. सयाजी गायकवाड, सुनील कबाडे, प्रकाश शेळके, भारती देशमुख व पदाधिकारी.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार होते.

चांदवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य नासिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह चांदवड येथे संपन्न झाली.

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार होते. यावेळी माजी आमदार उत्तम भालेराव, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, तालुका अध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, प्रकाश शेळके, विजय गांगुर्डे, युवक तालुकाध्यक्ष दत्ता वाघचौरे, विजय जाधव, भारती देशमुख, नगरसेवक नवनाथ आहेर, राजु पगारे, महिला अध्यक्ष साधना पाटील, श्रीमती सोनवणे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
यावेळी पक्षसंघटना बांधणी तसेच जनतेच्या प्रश्नावर चर्चा, प्रचंड वाढलेली महागाई, शेतकऱ्यांना पिक कर्ज, पेट्रोल डिझेल व गॅस भाववाढ, भविष्यात येणाऱ्या निवडणुका आदी विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रास्ताविकात प्रकाश शेळके यांनी लुक्यातील कार्यपध्दतीवर माहिती दिली.

बैठकीस सुनिल कबाडे, खंडेराव आहेर, आर. डी. थोरात, शहाजी पाटील, यु. के. आहेर, पंचायत समिती उपसभापती शिवाजी सोनवणे, सुकदेव जाधव, निवृत्ती घाटे,अल्ताफ तांबोळी, रुपम कोतवाल, अनिल पाटील, शैलैश ठाकरे, मधुकर टोपे, अनिल काळे, अरुण न्याहारकर, अनिल पवार, वसंत पगार, कैलास सोनवणे, महेश सोनवणे, तुकाराम पगार, महेश कोतवाल आदी उपस्थित होते. दत्तात्रेय वाघचौरे यांनी आभार मानले.
 

Web Title: NCP meeting at Chandwad