ऑनलाइन रोलेट फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाहीची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 23:11 IST2021-08-23T23:08:04+5:302021-08-23T23:11:08+5:30

दिंडोरी : ऑनलाइन रोलेट(बिंगो) फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाही व्हावी व रा.वि.कॉं.जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी दिंडोरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन केली आहे.

NCP demands action against online roulette gamblers | ऑनलाइन रोलेट फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाहीची राष्ट्रवादीची मागणी

ऑनलाइन रोलेट फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाहीची राष्ट्रवादीची मागणी

ठळक मुद्दे 15 दिवसांत जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल.

दिंडोरी : ऑनलाइन रोलेट(बिंगो) फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाही व्हावी व रा.वि.कॉं.जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी दिंडोरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन केली आहे.

नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर व पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले यांना राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, अनेक वर्षापासुन नाशिक शहर व जिल्ह्यात गेमकिंग कंपनीचे रोलेट(बिंगो)नावाने आॅनलाईन जुगारीची लिंक व ॲपच्या माध्यमातुन हजारो युवकांना आर्थिक,मानसिक व तसेच गुंडाच्या माध्यमातुन शारिरीक छळाला सामोरे जावा लागले आहे.जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचेही समोर आलेले आहेत यामध्ये नाशिक शहरात बिंगोचे मोठे नेटवर्क उभे राहीलेले असुन गेल्या दोन वर्षात अनेक गुन्हे गेमकिंग कंपनीचे सर्वेसर्वा रमेश चौरसिया व आचल चौरसिया आणि तसेच नाशिक जिल्ह्याचा डिस्ट्रीब्युटर कैलाश शहा यांच्यावर अनेक पोलिस तक्रारी दाखल असतांनाही त्यांच्यावर मोक्क्याची कार्यवाही का झालेली नाही??

सर्वसाधारण माणासाने थोडातरी काही गुन्हा केला तर त्यांच्यावर नको ती कार्यवाही होते मग सदर रोलेट किंग चौरसिया व शहा हे प्रशासनाचे जावई आहे का? रोलेट चालवणाऱ्या व आयडी देण्याऱ्या सर्व एजंटची जर व्यवस्थित चौकशी केली तर जिल्ह्यातील सर्वात मोठी गुन्हेगारांची साखळी यामधून बाहेर येईल,जर जिल्ह्यातील गुन्हेगारी समुळ नष्ट करायची असेल तर खरचं संबंधित गुन्हेगारांवर मोक्क्याची येत्या आठ दिवसात करण्यात यावी.

तरुणाई या जुगारात अडकून आपले भवितव्य खराब करून घेत आहॆ , पण येणाऱ्या असंख्य तरुण पिढीला या जुगराची सवय न लावण्यासाठी आंदोलनास आम्ही सर्व प्रकारे मदत करू तसेच याप्रकरणा मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष नंदन भास्करे हे सातत्याने पाठपुरावा कराता आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्यात येत आहे

सदर रोलेट चालवणारे यांचे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत सलोख्याचे संबंध आहेत तसेच अनेक सराईत गुन्हेगार हे रोलेट चा व्यवसायात आपले उदरनिर्वाह करतायेत या मध्ये पोलिस विभागाने तातडीने लक्ष घालून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नंदन भास्करे यांना लवकरात लवकर पोलिस संरक्षण द्यावे व जे रोलेट चालवणारे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. जर त्यांच्या वर कार्यवाही नाही झाली तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या माध्यमातून येत्या 15 दिवसांत जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदनावर तालुका अध्यक्ष रोशन अपसुंदे,तौसिफ मणियार,निलेश गटकल , गौरव सोमवंशी, भूषण देवरे,सहील मुलानी,आशिष वडजे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: NCP demands action against online roulette gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.