राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’, खोक्याच्या प्रतिकृती : शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी

By श्याम बागुल | Updated: June 20, 2023 15:59 IST2023-06-20T15:56:59+5:302023-06-20T15:59:21+5:30

नाशिक : शिंदे गटाने केलेल्या बंडाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहरात ‘गद्दार दिन’ साजरा करत खोक्याच्या प्रतिकृती हातात घेत ...

NCP Celebrates 'Traitor Day', Replica Box: Slogans Against Shinde Group nashik | राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’, खोक्याच्या प्रतिकृती : शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी

राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’, खोक्याच्या प्रतिकृती : शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी

नाशिक : शिंदे गटाने केलेल्या बंडाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहरात ‘गद्दार दिन’ साजरा करत खोक्याच्या प्रतिकृती हातात घेत “५० खोके एकदम ओके” अशा घोषणा देण्यात आल्या.

शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगिता आहेर, संजय खैरनार, विष्णुपंत म्हैसधुणे, गौरव गोवर्धने, समीना मेमन आदी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, मागील वर्षी याच दिवशी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केले होते. या सर्व घडामोडी घडून एक वर्ष पूर्ण झाल्याने राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा केला. यावेळी मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, राजाराम धनवटे, जीवन रायते, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ, नदीम शेख, मुरलीधर भामरे, राजेंद्र शेळके, सागर लामखेडे आदी उपस्थित होते.

Web Title: NCP Celebrates 'Traitor Day', Replica Box: Slogans Against Shinde Group nashik