शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 4:24 PM

पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली

ठळक मुद्देनव्या संकेतस्थळाचे अनावरण‘वेळोवेळी कायद्याच्या परीक्षा घ्या’

नाशिक : पोलीस अधिकारी-कर्मचारी राज्याच्या पूर्वेकडील नक्षली भागात सेवा करण्याबाबत नाखूष असतात; मात्र नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत सकारात्मकता दाखवून देशसेवेची एक उत्तम संधी म्हणून त्याकडे बघावे आणि स्वत:च्या मनाची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले. पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नक्षली भागातील सेवा करण्याबाबत पोलिसांचा असलेला नकारात्मक दृष्टिकोन ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. पोलिसांनी देशसेवेसाठी कुठल्याही भागात जाण्याची तयारी ठेवून उत्तम संधी म्हणून आपले कौशल्य दाखवून आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. यावेळी माथूर यांनी पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत असलेल्या दृष्टिकोनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणालाही यामधून सूट दिली जाणार नाही. २७ परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांनी आपली मानसिकता तयार करावी आणि आतापासूनच तेथे सेवा बजावण्याबाबत स्वत:ला सज्ज ठेवावे, अशा सूचनेतून इशारा दिला. प्रशिक्षण केंद्रात मूलभूत शिक्षण देत अधिकारी घडविण्याची जबाबदारी अकादमीवर असते. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांनी अकादमीमध्ये नियुक्ती घेत सेवा कार्य बजवावे, असेही माथूर म्हणाले. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अकादमीच्या नूतन संचालक अश्वती दोरजे, सहसंचालक जालिंदर सुपेकर, मंजुला माथूर, रोहिणी दराडे आदी उपस्थित होते.दरम्यान, माथूर यांच्या हस्ते नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच अकादमीच्या आवारात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी वनमहोत्सवाला हातभार म्हणून वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध रोपांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक राहण्याचा संदेश पोलीस दलाला दिला.

‘वेळोवेळी कायद्याच्या परीक्षा घ्या’सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी आपापल्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस अधिकाºयांच्या वेळोवेळी कायद्याच्या परीक्षा घेण्यावर भर द्यावा, अशी सूचनाही माथूर यांनी यावेळी केली. कारण आजच्या आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कायद्याबाबतचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरज आहे, असे सांगत यासाठी ई-अकॅडमीवर उपलब्ध आॅनलाइन परीक्षेचा वापर करणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सुचविले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयnaxaliteनक्षलवादी