नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 22:43 IST2019-10-06T22:41:58+5:302019-10-06T22:43:17+5:30

निफाड : शहरात शारदीय नवरात्रोत्सवात विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. येथील शांतीनगर निवासिनी सप्तश्रृंगी देवी मंदिरात, उगाव रोड येथील तुळजा भवानी मंदिर, उगावकर वाडा, लक्ष्मी देवी या देवी मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे.

Navratri festive atmosphere | नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण

नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण

ठळक मुद्देनिफाड : विद्युत रोषणाईद्वारे आकर्षक सजावट

निफाड : शहरात शारदीय नवरात्रोत्सवात विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. येथील शांतीनगर निवासिनी सप्तश्रृंगी देवी मंदिरात, उगाव रोड येथील तुळजा भवानी मंदिर, उगावकर वाडा, लक्ष्मी देवी या देवी मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे.
निफाड शहरात रायगड मित्र मंडळ, अजिंक्ययोद्धा मित्र मंडळ, राजमुद्रा प्रतिष्ठान, साम्राज्य युवा ग्रुप, उमिया मित्र मंडळ, महाराणा मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, शिवनेरी ग्रुप कला, क्र ीडा, मित्र मंडळ, गायत्री मित्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळ इतर मंडळानीही देवी मूर्तीची स्थापना आणि घटस्थापना केली आहे. शहरात विविध मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रायगड मित्र मंडळाने मार्केट यार्ड मैदानावर तर अजिंक्ययोद्धा मित्र मंडळाने पंचायत समितीसमोर पाळणे, आकाश पाळणे व इतर करमणुकीचे खेळ बसवून जत्रेचे स्वरूप दिले आहे.
या ठिकाणी रात्री या खेळांचा आंनद घेण्यासाठी नागरिक, लहानथोरांची गर्दी होत आहे. तर लक्ष्मी ग्रुप, वंदे मातरम् ग्रुपने दांडिया, गरबा नृत्याचे आयोजन केले आहे. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तालुक्यातील खेडे येथील ५२ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जागृत देवस्थान हिंगलाज देवीमाता मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. जळगांव येथे रेणुकामाता मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे.









 

Web Title: Navratri festive atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.