शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

नवरात्रोत्सव तोंडावर : २० दिवसांत ७ चेन स्नॅचिंग; पोलिसांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 2:14 PM

जेमतेम पाच ते सहा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात.

ठळक मुद्देकालिकामातेच्या दर्शनासाठी महिला पहाटे पायी दाखल होतातगणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त

नाशिक : गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आगामी नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना पुन्हा सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडू लागल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी (दि.२१) गोविंदनगर येथे रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ज्योती सुहास सोनवणे (४४) या गृहिणी भाजीपाला खरेदी करून घरी पायी जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरूण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी समोरून हिसकावून पळ काढला. सुमारे ३० हजार रूपये किंमतीची एक तोळ्याची सोनसाखळी चोरी झाल्याची फिर्याद सोनवणे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.

चार दिवसांपुर्वीच सकाळी ७.३० वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. दीपालीनगर येथे माधुरी अजित रुंद्रे (६७) या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. रुंद्रे या सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. चार दिवसांत मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी सोनसाखळीची घटना घडली.नवरात्रोत्सवात मोठे आव्हानजेमतेम पाच ते सहा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात. यावेळी पुन्हा अशाप्रकारचे गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुचाकीस्वार चोरटे सकाळी आणि सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असल्याचे अद्याप घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे. कालिकामातेच्या दर्शनासाठी महिला विविध भागांमधून पायी पहाटे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात दाखल होतात. रात्री उशिरादेखील या भागातून महिलांची वर्दळ नवरात्रोत्सवात असणार आहे. त्यामुळे मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह सर्वच पोलिस ठाण्यांना आपआपल्या हद्दीत पहाटेपासून सायंकाळपर्यंत पोलीस गस्त अधिक सक्षम करावी लागणार आहे.--

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNavratriनवरात्री