छगन भूजबळ यांच्या नेत्वृत्वात नाशकात होणार राष्ट्रवादी काँग्रेसची संविधान बचाओ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:32 IST2018-08-20T13:27:42+5:302018-08-20T13:32:37+5:30

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने 'संविधान बचाओ .. देश बचाओ' कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांर्गत नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आली आहे.

Nationalist Congress Party's Chagan Bhujbal's Constitution, the Constitution Save Rally | छगन भूजबळ यांच्या नेत्वृत्वात नाशकात होणार राष्ट्रवादी काँग्रेसची संविधान बचाओ रॅली

छगन भूजबळ यांच्या नेत्वृत्वात नाशकात होणार राष्ट्रवादी काँग्रेसची संविधान बचाओ रॅली

ठळक मुद्देराष्ट्रवादी महिला काँग्रेसचा संविधान बचाओचा नारा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणार रॅली नाशिकमध्ये राष्ट्रवादीची सरकराविरोधात रणनिती

नाशिक : विविध समाजकंटकांकडून समाजात द्वेष पसरिवला जात असून त्यास सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने कडून 'संविधान बचाओ .. देश बचाओ' कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांर्गत नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी दिली आहे. सरकारच्या विरोधात सर्व समाज रस्त्यावर येत आहे. सरकारकडे कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नाही. नोटाबंदी व विविध निर्णयामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. माहिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. लोकशाहाची कोणताही स्तंभ सुरक्षित नाही. सरकार गुंडगिरीलाच शाब्बासकी देत आहे. यांचा विरोध करण्यासाठी 'संविधान बचाओ.. भारत बचाओ' हा कार्यक्रम देशभर घेतला जात असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संविधान बचाओ अभियानाची सुरवात दिल्लीतून झाली असून त्यानंतर मुंबई, नागपूर  येथे आंदोलन करण्यात आले आहे. आता राज्यात सर्व ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन मनुस्मृती व इव्हीएम मशिनची होळी केली जात आहे. त्याचाच एक भाग 23 ऑगस्टला सकाळी 11 वाजता रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, माजी खासदार समीर भुजबळ, यांच्यासह प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. 

Web Title: Nationalist Congress Party's Chagan Bhujbal's Constitution, the Constitution Save Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.