शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

राष्टवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:28 AM

शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जम्मू-काश्मीरातील कथुआ येथील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्यावी, मागणी या मागणीसाठी सिडकोत महिलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.

नाशिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जम्मू-काश्मीरातील कथुआ येथील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्यावी, मागणी या मागणीसाठी सिडकोत महिलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.  जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, भाजपाच्या राज्यात महिला व बालिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली सिडको, राणा प्रताप चौक येथे महिलांच्या वतीने कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कॅन्डल मोर्चात सहभागी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, हिना शेख, पुष्पा राठोड, रजनी चौरसिया, संगीता चौधरी, सुजाता कोल्हे, मंगला मोरे, संगीता अहिरे, निता वडनेरे, संगीता सानप, विजया जाधव, प्रमिला पाटील, रंजना वाघ, शमा शेख, आशा ठाकरे, पूजा चौधरी, मंगल बागुल, अंजली निकम, प्रिया कापुरे, पुष्पा निकम, सविता कासार, प्रयाग कापुरे, नेहा नहिरे, कल्याणी जाधव, वैशाली तायडे यांसह आदी महिला उपस्थित होत्या.कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, सामाजिक कार्यकर्त्या अनिता गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली काळ्या फिती बांधून देवळाली कॅम्प येथे लामरोडवरील भैरवनाथ मंदिर ते जमाल नाकापर्यंत कॅण्डल मार्च व मूक मोर्चा काढण्यात आला. जम्मूमधील कथुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर देवळालीच्या लामरोड भागातील नागरिकांनी एकत्र येत निषेध नोंदविला. आरोपींना कठोर शासन व्हावे, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह अनेक पोस्टर घेऊन परिसरातील नागरिकांसह अरु ण जाधव,विठ्ठलराव खातळे, कैलास गोडसे, सागर गोडसे, यास्मिन नाथानी, वैशाली निकम, वंदना माळी, विजय निकम, संजय जाधव, राहुल धुर्जड, राजेश धुर्जड, राजश्री जाधव, सुनील चव्हाणके, तेजस शेळके, विनोद जाधव, रघुनाथ गोरखे, रेखा जाधव, सचिन पाळदे, सविता गोडसे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस