रुपाली कोठावदे यांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:40 IST2021-03-15T21:25:05+5:302021-03-16T00:40:00+5:30
सटाणा : येथील समको बँकेच्या माजी अध्यक्ष व इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊनच्या माजी अध्यक्ष रूपाली परेश कोठावदे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली येथील स्वर्ण भारत परिवार व राष्ट्रीय महिला सशक्तीकरण कल्याण मंडळातर्फे राष्ट्रीय नारीशक्ती - मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रुपाली कोठावदे यांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार
कोठावदे यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सटाणा मर्चंट बँक, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, यशश्री महिला बचत गट या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात सोनल मानसिंग, सामाजिक कार्यकर्त्या राधिका चिमा, दिल्ली महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल, आंतरराष्ट्रीय योगगुरु आनंदगिरी महाराज, आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल इंका वर्मा, योगगुरू पंडित हेमंत गुरु महाराज, संदीप मारवाह व जीएसटीचे आयुक्त राकेश आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कोठावदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.