गार्गी जोशीला राष्ट्रीय विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:37 IST2021-03-12T23:12:25+5:302021-03-13T00:37:19+5:30
इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

गार्गी जोशीला राष्ट्रीय विजेतेपद
सातपूर : इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
भारतातील सर्व आघाडीचे मेमरी ॲथलिट या स्पर्धेत सहभागी झाले असताना, अवघ्या १२ वर्षांच्या गार्गीने आपल्या स्मरणशक्तीचे कसब दाखवत नेत्रदीपक यश संपादन केले. या स्पर्धेत देशातील सर्व आघाडीचे, नावाजलेले आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मेमरी ॲथलिट सहभागी होतात. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेतल्यामुळे स्मरणशक्तीबरोबरच तंत्रज्ञानाचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. अवघ्या १२ वर्षांच्या गार्गीने हे आव्हान लिलया पेलत तिच्या वयोगटात स्पर्धेचे विजेतेपद तर मिळवलेच पण ओपन रँकिंगमध्येही पाचवे मानांकन मिळवत आपल्या प्रतिभेची चुणुक दाखवली आहे. गार्गीने यापूर्वी तुर्कस्थान येथे आयोजित ‘मेमोरियाड ओपन मेमरी चॅम्पियनशिप २०१८’ या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत एक सुवर्ण, दोन रजत आणि एका कांस्यपदकाची कमाई अवघ्या नवव्या वर्षी केली होती. गार्गी ही नाशिकमधील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्तेन जोशी यांची कन्या आहे.