शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

थंडीच्या कहरने नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:58 IST

थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा अव्वलस्थानी राहिले आहे.

ठळक मुद्देगारठा : पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला

नाशिक : थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा अव्वलस्थानी राहिले आहे.उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट रविवारी (दि.१०) मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनावश्यकरीत्या सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळावे. उबदार कपड्यांचा पुरेपूर वापरास प्राधान्य द्यावे. सकाळच्या वेळीस व्यवसाय करणाºया विक्रेत्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शहराचे किमान तापमान पाच दिवसांपूर्वी १७ अंशांपर्यंत वर सरकले होते. त्यामुळे थंडीपासून दिलासा नागरिकांना मिळाला होता; मात्र थंड वाºयाचा वेग अचानकपणे वाढल्याने किमान व कमाल तापमानात मोठी घसरण होऊन शनिवारी (दि.९) सकाळी साडेआठ वाजता पारा ४ अंशांवर घसरला तर कमाल तापमान ३२ अंशांवरून २४ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिकच जाणवत आहे. त्यामुळे नाशिककर शुक्र वारपासून कमालीचे गारठले आहेत.बुधवारी रात्रीपासून शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात निर्माण झालेला गारवा कायम टिकून राहिला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत ताशी १३ कि.मी. वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली होती. त्यामुळे शुक्रवारी किमान तापमान १३.२ अंशांवरून थेट ९ अंशांवर घसरले. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेनंतर पुन्हा थंड वाºयाचा वेग वाढल्याने शनिवारी सकाळी पारा ४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.थंडीच्या कडाक्याने घरात बसणेदेखील मुश्कील झाल्यामुळे उघड्यावर झोपडीत राहणाºया भटक्या लोकांचे आतोनात हाल होत आहे. तसेच गोदेच्या किनारी उघड्यावर किंवा मंदिरांच्या आवारात राहून रात्र काढणारे भिक्षुकवर्ग थंडीने बेहाल झाला असून, गोदाकाठावर शेकोट्या पेटवून हा ऊब मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान