शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षिकेकेने अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राद्वारे केली शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:34 IST

नाशिक : अपंग लोकसेवकांना सोईच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे या शिक्षिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे मुंगसरे शाळेतील शिक्षिका : जिल्हातंर्गत बदलीजळगाव जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र ; पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : अपंग लोकसेवकांना सोईच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे या शिक्षिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुवर (४६, रा. अनमोल नयनतारा सिटी, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फियार्दीनुसार, नाशिक तालुक्यातील मुंगसरे जिल्हा परिषद शाळेत वैशाली सुधाकर सोनवणे (रा. नाशिक) या शिक्षिका आहेत. त्यांनी सन २०१७ -१८ दरम्यान शासनाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाईन अर्ज केला होता. अपंग लोकसेवकांना सोईच्या ठिकाणी बदली देण्याबाबत शासनाचे निर्देश असल्याने याचा फायदा घेण्यासाठी शिक्षिका सोनवणे यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडील अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतले व ते जिल्हाांतर्गत बदलीसाठी आॅनलाईन अर्जाद्वारे शासनास सादर केले.

पंचायत समितीने सोनवणे यांनी केलेल्या आॅनलाईन अर्जातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे समोर आले़ त्यामुळे गटशिक्षण अधिकारी कुंवर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकPoliceपोलिसCrimeगुन्हा