शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

लासलगावला पिकअप वाहनासह अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:40 IST

नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाºया चोरट्या मद्यवाहतूकीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके तसेच भरारी पथके कार्यान्वित केले असून येवला विभागाच्या अधिकाºयांनी चांदवड-लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा रचून मद्य व वाहनासह अडीच लाखाचा मद्यसाठा जप्त केला आहे़

ठळक मुद्देचांदवड - लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा मद्यसाठा व व्हॅन असा २ लाख ५७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणा-या चोरट्या मद्यवाहतूकीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके तसेच भरारी पथके कार्यान्वित केले असून येवला विभागाच्या अधिका-यांनी चांदवड - लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा रचून मद्य व वाहनासह अडीच लाखाचा मद्यसाठा जप्त केला आहे़लासलगाव परिसरातून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने चांदवड-लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारातील भारत पेट्रोल पंपासमोर सापळा रचला होता़ रस्त्याने जाणाºया संशयास्पद महिंद्रा पीकअप व्हॅनला (एमएच १५ एफक्यु ०३२०) रोखून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध मद्यसाठा आढळून आला़ या मद्यसाठ्यामध्ये मॅकडॉवेलच्या (१८० मि.लीच्या) १४४ बाटल्या, देशीदारू भिंगरी संत्राच्या (१८० मि.लिच्या) ११४० बाटल्या, प्रिन्स संत्राच्या (१८० मि.लिच्या) ९६० बाटल्यांचा समावेश आहे़राज्य उत्पादन शुल्कने मद्यसाठा व व्हॅन असा २ लाख ५७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित दीपक बाळू पोतदार (२५, रा. औरंगाबाद नाका, नाशिक), विशाल बाळू नेटावटे (२५, रा. पंचवटी) या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. उप आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी.बी. राजपूत, उपअधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन श्रीवास्तव, वाय. पी. रतवेकर, डी. आर. नेमणार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़

टॅग्स :Nashikनाशिकliquor banदारूबंदीPoliceपोलिसArrestअटक