महिलांच्या कार, बाईक रॅलीचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 18:31 IST2019-04-07T18:30:04+5:302019-04-07T18:31:06+5:30
नाशिक : पर्यावरण जनजागृती, आरोग्य संवर्धन आणि बेटी बचाव असा संदेश देण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या महिलांच्या कार आणि बाईक ...

महिलांच्या कार, बाईक रॅलीचा उत्साह
नाशिक: पर्यावरण जनजागृती, आरोग्य संवर्धन आणि बेटी बचाव असा संदेश देण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या महिलांच्या कार आणि बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला.
आयाम, वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयाम वुमन्स ड्राईव्ह २०१९’ ही स्पर्धा शहरात उत्साहात पार पडली. फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत स्कुटर गटात ८ तर कार गटात ३३ वाहनधारक महिलांनी सहभाग घेतला. दुचाकींसाठी ६० तर कार्स साठी १०० किमी एव्हढे अंसतर देण्यात आले होते. ऊ
शरणपूरोडवरून निघालेल्या रॅलीत विविध प्राण्यांची वेशभुषा करून महिलांनी प्राणी बचावचा संदेश दिला. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही वाहनांना संपुर्ण झाडे,पाने,फुलांनी सजविण्यात आले होते. त्याबरोबरच बेटीबचाव, पर्यावरण जनजागृतीविषयीचे फलकही झळकविण्यात आले.
--कोट--
नाशिकमध्ये अशी स्पर्धा बऱ्याच वर्षांनी झाली. त्यामुळे एक वेगळा आनंद आणि सामाजिक उपक्रम समाधान देऊन गेला. सर्व मैत्रीणी एका उद्देशाने एक िआल्याने सामाजिक एकोपो निर्माण होण्यास मदतच झाली. समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.
- अॅमी छेडा, सहभागी स्पर्धक