फ्लॅट खाली करण्यासाठी महिलेस जातीवाचक शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:41 IST2018-05-06T22:41:38+5:302018-05-06T22:41:38+5:30

नाशिक : फ्लॅट खाली करावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

nashik,women,atrocity,crime,registered | फ्लॅट खाली करण्यासाठी महिलेस जातीवाचक शिवीगाळ

फ्लॅट खाली करण्यासाठी महिलेस जातीवाचक शिवीगाळ

ठळक मुद्देसरकारवाडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नाशिक : फ्लॅट खाली करावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

नरसिंहनगर येथील अनुराधा अपार्टमेंटमधील रहिवासी संगीता प्रकाश मासरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित अजित राजाराम जाधव (रा़ वावी, ता़ सिन्नर) यांनी २५ एप्रिल रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेटजवळच्या भुयारी मार्गाजवळ धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली़ तसेच तुमची फ्लॅटमध्ये राहण्याची लायकी तरी आहे का, तुम्ही फ्लॅट खाली केला नाही तर तुम्हाला जिवे मारून टाकील अशी धमकी दिली़

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये संशयित अजित जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण करीत आहेत़

Web Title: nashik,women,atrocity,crime,registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.