शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सावधान, मांजातूनही उतरू शकतो वीजप्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:41 PM

नाशिक : मकरसंक्रातीनिमित्त पतंगबाजी करण्याचा पारंपरिक उत्सव साजरा केला जात असला तरी या उत्सवाचे स्वरुप बदलल्याने त्याचा फटका पतंग ...

नाशिक: मकरसंक्रातीनिमित्त पतंगबाजी करण्याचा पारंपरिक उत्सव साजरा केला जात असला तरी या उत्सवाचे स्वरुप बदलल्याने त्याचा फटका पतंग उडविणाऱ्या तरुणांना, नागकिांना आणि पक्ष्यांनाही होत आहे. या सणाच्या काळात पतंगाच्या मांजामुळे अपघात घडण्याचे प्रमाण मोठे असून विशेषता: वीजेच्या तारांजवळी मांजा आणि पतंग काढतांना अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महावितरणे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.शहर, ग्रामीण भागात वीज वितरणाच्या लघु ं ाणि उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडवितांना किंवा काटलेले पतंग वीजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात असे पतंग आणि मांजा काढण्याच्या प्रयत्नात अपघात होतात आणि अनेकांच्या जीवावर बेतते. विशेष म्हणजे बाजारात असलेल्या धातुमिश्रित आणि रासयनिक युक्त मांजांमधून विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते. असा मांजा प्रवाहीत विद्युत तारांमधून काढण्याचा प्रयत्न केल्यास वीजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्युत तारांवर अडकलेले पतंग आणि मांजा काढण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होऊ शकतो अशी शक्यता महावितरणने वर्तविली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकkiteपतंग