शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वाडीव-हेजवळील ट्रक - टेम्पो अपघातात दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 14:38 IST

नाशिक : मुंबई महामार्गावरील वाडीव-हे शिवारात ट्रक व टेम्पोमधील अपघातातानंतर दोन्ही वाहने उलटल्याने जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पाचोरा येथील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१८) पहाटे घडली़ जेलिम शेख गनी (४५), अजीम शेख कलीम (२२) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

ठळक मुद्देजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारवाडीव-हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद

नाशिक : मुंबई महामार्गावरील वाडीव-हे शिवारात ट्रक व टेम्पोमधील अपघातातानंतर दोन्ही वाहने उलटल्याने जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पाचोरा येथील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१८) पहाटे घडली़ जेलिम शेख गनी (४५), अजीम शेख कलीम (२२) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

वाडीव-हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास वाडीव-हे शिवारातील गतीरोधकाजवळ मुंबईला धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने (एम ०९, एचएच २०८९) समोरील टेम्पोला (एमएच ०४, बीव्ही ४८५२) ला पाठिमागून धडक दिली़ यामुळे टेम्पो महामार्गावर तर ट्रक महामार्गावरून खाली उतरून उलटला़ यामध्ये पाचोरा येथील जेलिम गनी व अजीम कलीम हे दोघे गंभीर जखमी झाले़ तर शोहन शेख कलीम (२२) हा किरकोळ जखमी झाला़

या अपघातानंतर नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती पाटील यांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ दरम्यान, या अपघाताची वाडीव-हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिसCrimeगुन्हा