भालेराव मळ्यातील नाइट टाइम जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:17 IST2018-01-12T17:15:29+5:302018-01-12T17:17:13+5:30
नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील भालेराव मळा परिसरात सुरू असलेल्या नाइट टाइम बाजार जुगार अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी गुरुवारी (दि़ ११) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये आठ जुगा-यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

भालेराव मळ्यातील नाइट टाइम जुगार अड्ड्यावर छापा
नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील भालेराव मळा परिसरात सुरू असलेल्या नाइट टाइम बाजार जुगार अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी गुरुवारी (दि़ ११) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये आठ जुगा-यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
भालेराव मळ्यातील अजमेर चिकन सेंटरशेजारी असलेल्या शेडलगत आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती़ त्यांनी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला़ यावेळी संशयित बबूल मोगल, रामदास वाघमारे, सुभाष बुकाने, लक्ष्मण काळे, विनोद मोरे, संतोष भावसार, नवीन नायर, बापू सरोदे हे नाइट टाइम बाजार नावाचा जुगार खेळत होते़ या संशयितांकडून पोलिसांनी ४ हजार ७०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य असा एकूण १५ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़