नाशिक : कामावरून घरी परतणा-या दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून त्यास बेदम मारहाण करून रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी (दि़४) सायंकाळच्या सुमारास सातपूर श्रमिकनगर परिसरातील सातमाऊली चौकात घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंडु सरदार मन्सुरी (रा़रो हाऊस नंबर२, सरगम रो हाऊस, सातमाऊली चौक, श्रमिकनगर, सातपूर) हे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी जात होते़ सातमाऊली चौकात संशयित अतुल खरे, आकाश इंगळे, राजू गांगुर्डे, माया गांगुर्डे, कौशल गांगुर्डे व त्यांचे आणखी दोन-तीन साथीदार (सर्व रा़श्रमिकनगर, सातपूर) यांनी मन्सुरी यांची दुचाकी अडवून त्यांना खाली पाडले़ यानंतर संशयितांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मन्सुरी यांच्या खिशातील एक हजार दोनशे रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले़या घटनेनंतर मन्सुरी यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठून संशयितांविरोधात फिर्याद दिली़
कामावरून घरी परतणा-या दुचाकीस्वाराची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 16:22 IST
नाशिक : कामावरून घरी परतणा-या दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून त्यास बेदम मारहाण करून रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी (दि़४) सायंकाळच्या सुमारास सातपूर श्रमिकनगर परिसरातील सातमाऊली चौकात घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कामावरून घरी परतणा-या दुचाकीस्वाराची लूट
ठळक मुद्देसातपूर श्रमिकनगर परिसर ; रस्ता अडवून बेदम मारहाणजबरी लुटीचा गुन्हा दाखल