गंगापूररोडवर दुचाकी घसरल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:07 IST2018-05-06T22:07:07+5:302018-05-06T22:07:07+5:30
नाशिक : मित्राला भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) दुपारच्या सुमारास सोमेश्वर लॉन्सजवळ घडली़ सदानंद तिवारी (२२, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

गंगापूररोडवर दुचाकी घसरल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
नाशिक : मित्राला भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) दुपारच्या सुमारास सोमेश्वर लॉन्सजवळ घडली़ सदानंद तिवारी (२२, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल खेमबहादूर थापा (१९, सातपूर) यास भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातून त्याचे मित्र राजन तिवारी व सदानंद तिवारी आले होते़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हे तिघेही (एमएच १५, एफडी ५८६०) दुचाकीने गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्ससमोरून जात होते़ यावेळी दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने ती घसरल्याने झालेल्या अपघातात सदानंद यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर राजन व कमल हे दोघे किरकोळ जखमी झाले़
दरम्यान, अपघाताची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़