दोन हजार विद्यार्थ्यांना मिळाले प्रथम पसंतीचे महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:33 IST2018-08-01T16:31:20+5:302018-08-01T16:33:14+5:30
अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतील तिसºया टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१४० इतकी आहे. तर दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३२३ इतकी आहे तर तिसºया पसंतीक्रमाचे महाविदयलय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९३२ इतकी आहे.

दोन हजार विद्यार्थ्यांना मिळाले प्रथम पसंतीचे महाविद्यालय
नाशिक : गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेली अकरावी प्रवेशप्रक्रिया अंतिम चरणात असून प्रवेशाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झालेली आहे. महापालिका हद्दीतील ५७ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या २७ हजार ७०० जागांपैकी ६१३७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अकरावीसाठी दाखल अर्जांची संख्या पाहाता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतील तिसºया टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१४० इतकी आहे. तर दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३२३ इतकी आहे तर तिसºया पसंतीक्रमाचे महाविदयलय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९३२ इतकी आहे.
कलाशाखेसाठी ११८०, विज्ञान शाखेसाठी २८३८, वाणिज्य शाखेकसाठी १९५८ तर एमसीव्हीसी शाखेत आजवर १५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदा अकरावीसाठी इच्छुक सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून असंख्य विद्यार्थी हे पॉलिटेक्निक आणि आयटीआयाकडे गेल्यामुळे काहीशी स्पर्धा कमी होणार आहे. अर्ज केलेले सर्वच विद्यार्थी हे अकरावीसाठी प्रवेश घेत नसल्यामुळे प्रवेशाच्या पुढच्या फेºयांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक जागा उपलब्ध होणार आहे.