ट्रकमधील तीन लाखांच्या तूरडाळीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:03 IST2018-06-26T14:17:54+5:302018-06-26T15:03:31+5:30
नाशिक : रात्रीच्या सुमारास झोप येत असल्याने रस्त्याच्या बाजुला लावलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची तूरडाळ चोरून नेल्याची घटना विल्होळी जकात नाक्याजवळ घडली़ चोरट्यांनी या ट्रकमधील २५३ तुरडाळीच्या गोण्या चोरून नेल्या आहेत़

ट्रकमधील तीन लाखांच्या तूरडाळीची चोरी
नाशिक : रात्रीच्या सुमारास झोप येत असल्याने रस्त्याच्या बाजुला लावलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची तूरडाळ चोरून नेल्याची घटना विल्होळी जकात नाक्याजवळ घडली़ चोरट्यांनी या ट्रकमधील २५३ तुरडाळीच्या गोण्या चोरून नेल्या आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील ट्रकचालक शरीफ सुभान शेख हा रविवारी (दि़२४) रात्री ट्रकमधून (एमएच १८ बीए ००५५) दोन लाख ९० हजार रुपये किमीतीची २५३ तुरडाळीची पोती घेऊन धुळ्याला जात होता़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबई - आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारातून जात असताना शेख व त्याचा क्लिनर या दोघांना झोप येत असल्याने त्यांनी विल्होळी जकात नाक्याजवळ ट्रक थांबवून ते झोपले़ दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या ट्रकमधील २५३ तूरडाळीचे पोते चोरून नेले़
याप्रकरणी ट्रकचालक शरीफ शेख याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़