नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनमालकांच्या आक्षेपास आता थारा असणार नाही़ याबरोबरच या वाहनावरील हायड्रोलिक प्रणालीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान टळणार असले तरी बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे़शहरात पार्किंगसाठी पुरेशा जागेचा अभाव असल्याने रस्त्यात कुठेही दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहतात व पर्यायाने वाहतूक कोंडी व अपघातांची संख्या वाढली होती़ यामुळे पोलीस आयुक्तांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये टोइंग ठेकेदार नेमून बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या असणाºया वाहनांवर टोइंगची कारवाई सुरू केली. पुवीच्या ठेकेदाराची मुदत संपल्याने निविदा काढून नवा टोर्इंग ठेकेदार नेमण्यात आला आहे़ टोर्इंग कारवाईदरम्यान ठेकेदाराकडील कर्मचारी व वाहतूक पोलिसांसोबतच वाहनचालकांचे वाद होत असल्याने ते टाळण्यासाठी पोलिसांनी ठेकेदारांना नियमावलींची पुर्तता करण्याचे आदेश दिले होते.पोलिसांच्या मागणीसाठी टोर्इंग ठेकेदाराने अत्याधुनिक अशी प्रत्येकी चार टोर्इंग वाहने मागविली आहे़ त्यामध्ये चारचाकी व दुचाकी उचलण्यासाठी वेगवेगळी वाहने असून त्याचे प्रात्यक्षिक गुरुवारी (दि़४) पोलीस आयुक्तालयात दाखविणयात आले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे आणि वाहतूक ठेकेदार समीर शेटे आदी उपस्थित होते़टोर्इंग वाहनावर चार सीसीटीव्ही
नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:14 IST
नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनमालकांच्या आक्षेपास आता थारा असणार नाही़ याबरोबरच या वाहनावरील हायड्रोलिक प्रणालीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान टळणार असले तरी बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे़
नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने
ठळक मुद्देटोर्इंग वाहनावर चार सीसीटीव्ही ; तडजोड शुल्कात वाढ