परतीच्या पावसाने सर्व धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 07:22 PM2019-10-27T19:22:02+5:302019-10-27T19:23:36+5:30

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर ...

nashik,the,return,rains,filled,fall,the,dams | परतीच्या पावसाने सर्व धरणे भरली

परतीच्या पावसाने सर्व धरणे भरली

Next
ठळक मुद्दे१०० टक्के पाणीसाठा : गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के अधिक साठा

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलतेन पाणीसाठा २४ टक्के अधिक असल्याने पाणी नियोजनासंदर्भात होणारा वाद यंदा टळणार असल्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच धरणांचा पाणीसाठा ९० टक्केच्यापुढे आणि १५ तारखेपर्यंत गिरणा खोºयातील एक-दोन प्रकल्प वगळता धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. तत्पूर्वी आॅगस्टअखेरलाही धरणसाठा शंभर टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबरच्या पावसात शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाला होता. त्यामुळे सातत्याने विसर्ग वाढवावा लागला होता. आता आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वाढला आहे.
यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने आळंदी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ६५,५३५ दलघफू पाणीसाठा म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवषीआॅक्टोबर अखेर अवघा ७६ टक्के इतका पाणीसाठा होता. जिल्ह्यात गंगापूर धरणसमूहात ४ धरणांचा समावेश आहे तर पालखेड धरण समूहात सहा धरणे आहेत. दारणा समूहातदेखील सहा धरणांचा समावेश आहे. भोजापूर हा मध्यम प्रकल्प आहे. गिरणा खोरे धरणसमूहात चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा असे पाच प्रकल्प आहेत, तर दोन मध्यमस्वरूपाचे प्रकल्पआहेत.

Web Title: nashik,the,return,rains,filled,fall,the,dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.