शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

वडाळागावातील भंगार मालाच्या गुदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 6:20 PM

वडाळागाव/इंदिरानगर : वडाळागावातील सादिकनगर भागातील प्लास्टिक भंगार मालाच्या गुदामाला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे दोन ...

ठळक मुद्देसादीकनगर : दोन तास प्रयत्न:

वडाळागाव/इंदिरानगर : वडाळागावातील सादिकनगर भागातील प्लास्टिक भंगार मालाच्या गुदामाला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.वडाळागावातील सादिक नगरमधील एका गोदामात शुक्र वारी दुपारी भीषण आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे क्षणार्धात आगीने रु द्रावतार धारण केले. सुदैवाने भंगार गोदाम बंद होते. गोदामांमध्ये कोणीही नसल्यामुळे धोका टळला. आग नेमकी कशी लागली हे निश्चित कळू शकले नाही. मात्र भंगार गोदामाच्या जवळच कचरा पेटविण्यात आल्यामुळे वाळलेल्या गवताला आग लागली आणि ही आग गुदामाच्या बाहेर मोकळ्या जागेत असलेलेया प्लास्टिक पर्यंत पोहोचल्यामुळे गुदामाला आग लागली असावी असा अंदाज वर्तर्विला जात आहे. आगीमुळे आकाशात धुराचे लोट उठले होते. आग इतकी भीषण होती की वाºयामुळे ज्वाला अधिक भडकत होत्या.आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने रहिवासी प्रचंड घाबरले होते. आग वाढत असल्याने रहिवाशांनी तात्काळ घरे रिकामी केल तर घरांमधील गॅस सिलिंडर सुरिक्षत ठिकाणी हलविण्यात आले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उंचीवर उठल्याने इंदिरानगर, डिजपीनगर, खोडेनगर, दिपलीनगर या भागातून आकाशात धुराचे लोट नागरिकांना दिसत होते. बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.आगीची घटना मोठी असल्याने सिडकोच्या बंबावरील जवानांनी मुख्यालयातून अधिक मदत बोलाविली. त्वरीत जादा क्षमता असलेले दोन मोठे बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुमारे पंधरा ते वीस जवानांनी पाण्याचा मारा करत आगीला आटोक्यात आणले.बघ्याची गर्दी झाल्यामुळे गर्दीचा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आग विझविण्याच्या कामास अडथळा निर्माण होत होता. पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणल्याने अग्निशामक दलाला मोठी मदत झाली. त्यामुळे आग विझविण्याचे कार्य सुरळीत व सुरिक्षत पार पडले.--इन्फा---भंगार गुदामे हटविण्याची मागणीवडाळागाव परिसरातील अनेक भागात मोठया संख्येने भंगरमालाची गुदामे आहेत. या गुदामाना वारंवार आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे परिसरातून भंगाराची गुदामे हटविण्यात यावी अशी मागणी यावेळी रहिवाश्यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने व्यवसायाला परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या भागातील सर्वेक्षण करून तात्काळ अनिधकृत गुदामे हटविण्यात यावी अशी मागणी या भागातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग