वडाळागावातील भंगार मालाच्या गुदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:21 IST2018-12-07T18:20:19+5:302018-12-07T18:21:20+5:30
वडाळागाव/इंदिरानगर : वडाळागावातील सादिकनगर भागातील प्लास्टिक भंगार मालाच्या गुदामाला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे दोन ...

वडाळागावातील भंगार मालाच्या गुदामाला आग
वडाळागाव/इंदिरानगर : वडाळागावातील सादिकनगर भागातील प्लास्टिक भंगार मालाच्या गुदामाला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
वडाळागावातील सादिक नगरमधील एका गोदामात शुक्र वारी दुपारी भीषण आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे क्षणार्धात आगीने रु द्रावतार धारण केले. सुदैवाने भंगार गोदाम बंद होते. गोदामांमध्ये कोणीही नसल्यामुळे धोका टळला. आग नेमकी कशी लागली हे निश्चित कळू शकले नाही. मात्र भंगार गोदामाच्या जवळच कचरा पेटविण्यात आल्यामुळे वाळलेल्या गवताला आग लागली आणि ही आग गुदामाच्या बाहेर मोकळ्या जागेत असलेलेया प्लास्टिक पर्यंत पोहोचल्यामुळे गुदामाला आग लागली असावी असा अंदाज वर्तर्विला जात आहे. आगीमुळे आकाशात धुराचे लोट उठले होते. आग इतकी भीषण होती की वाºयामुळे ज्वाला अधिक भडकत होत्या.
आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने रहिवासी प्रचंड घाबरले होते. आग वाढत असल्याने रहिवाशांनी तात्काळ घरे रिकामी केल तर घरांमधील गॅस सिलिंडर सुरिक्षत ठिकाणी हलविण्यात आले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उंचीवर उठल्याने इंदिरानगर, डिजपीनगर, खोडेनगर, दिपलीनगर या भागातून आकाशात धुराचे लोट नागरिकांना दिसत होते. बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.
आगीची घटना मोठी असल्याने सिडकोच्या बंबावरील जवानांनी मुख्यालयातून अधिक मदत बोलाविली. त्वरीत जादा क्षमता असलेले दोन मोठे बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुमारे पंधरा ते वीस जवानांनी पाण्याचा मारा करत आगीला आटोक्यात आणले.
बघ्याची गर्दी झाल्यामुळे गर्दीचा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आग विझविण्याच्या कामास अडथळा निर्माण होत होता. पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणल्याने अग्निशामक दलाला मोठी मदत झाली. त्यामुळे आग विझविण्याचे कार्य सुरळीत व सुरिक्षत पार पडले.
--इन्फा---
भंगार गुदामे हटविण्याची मागणी
वडाळागाव परिसरातील अनेक भागात मोठया संख्येने भंगरमालाची गुदामे आहेत. या गुदामाना वारंवार आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे परिसरातून भंगाराची गुदामे हटविण्यात यावी अशी मागणी यावेळी रहिवाश्यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने व्यवसायाला परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या भागातील सर्वेक्षण करून तात्काळ अनिधकृत गुदामे हटविण्यात यावी अशी मागणी या भागातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.