नाशिक- येथील करिश्मा देसले या विद्यार्थीनीची दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा या नाट्यसंस्थेत निवड झाली आहे. कला आणि नाट्य क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशात केवळ २० जणांची निवड करण्यात आली. यात महाराष्टÑाती प्रविण मडके, निखिल ठाकुर आणि नाशिकच्या करिश्मा देसले यांचा समावेश आहे.करिश्मा मराठा हायस्कूलची विद्यार्थीनी असून वाणिज्य शाखेतून तीने पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. लहानपणापासून ती शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असे. अभिनयाची आवड असल्याने याच क्षेत्रात करियर करायचे असे ठरवुन नाटकांमधुन काम करण्यास प्रारंभ केला होता. आजवर तिने विविध एकांकिका, नाटकांमधुन अभिनय केला आहे. अनेक पारितोषिकेही पटकावली आहेत. तिला बाळकृष्ण तिडके, अंशु सिंग, सुधीर कुलकर्णी, रवींद्र कदम, सुनील ढगे यांचे मार्गदर्शन लाभले.
नाशिकच्या करिश्मा देसलेची ‘एनएसडी’साठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:15 IST
कला आणि नाट्य क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशात केवळ २० जणांची निवड
नाशिकच्या करिश्मा देसलेची ‘एनएसडी’साठी निवड
ठळक मुद्देकला आणि नाट्य क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशात केवळ २० जणांची निवड